Latest News

6/recent/ticker-posts

माजी पं.स सभापती अयोध्याताई केंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

माजी पं.स सभापती अयोध्याताई केंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प



माझे पती जि.प सदस्य तथा पं.समिती माजी सभापती अशोक( काका )केंद्रे व मी सभापती असताना अहमदपूर-चाकुर मतदार संघातील रस्त्याच्या दुतर्फा तसेच मोकळ्या जागेत हजारो वृक्षांची लागवड केली असुन कडक उन्हाळ्यात देखील टँकरद्वारे पाणी पुरवठा केला आहे त्याचप्रमाणे त्या वृक्षांचे संगोपन करून मोठे केले आहेत व यापुढेही करीत राहु असा संकल्प पंचायत समिती माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रतिनिधिशी बोलताना केला.


अयोध्याताई केंद्रे 


माजी प.स.सभापती अहमदपुर


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) येथील माजी पंचायत समिती सभापती अयोध्याताई केंद्रे यांचा दि २७ जुलै रोजी वाढदिवस होता कोरोना संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर वाढदिवस साजरा न करता ५१ दिपप्रज्वलीत करुन पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केंद्रे परिवाराच्या वतीने करण्यात आला.


     याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर पंचायत समितीच्या माजी सभापती अयोध्याताई केंद्रे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी होता दरवर्षी त्यांच्या चाहत्याकडून त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो तालुक्यात त्यांना कोणी अन्नपूर्णा म्हणतात तर कोणी अनाथाची माय केंद्रे परिवार तालुक्यातील गोरगरीब गरजुंना नेहमी मदतीचा हात पुढे करत असतात त्यामुळे तालुक्यात त्यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे त्यांच्या घरून आत्तापर्यंत कोणीही गरजु व्यक्ती मदतीवीना परत आला असे तरी कधी ऐकले नाही अशा या बहुआयामी व्यक्तींमत्वाचा वाढदिवस या वर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या वाढत्या पार्श्वभुमीवर साजरा न करण्याचे ठरवले होते.


अयोध्याताई केंद्रे यांनी अहमदपूर-चाकुर तालुक्यातील माझ्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम बंधु -भगीनींना आवाहन केले होते की कोरोनाच्या जागतीक महामारीमुळे आपण सर्वजन त्रस्त झालेले आहोत आपले प्रेम आणी आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर आहे याची मला पुर्ण जाणीव आहे यामुळे या वर्षी कोणत्याही आप्त नातेवाईक,कार्यकर्ते यांच्याकडून वाढदिवसाच्या पुष्प,हार,फेटा,शाल. इत्यादी प्रकारच्या शुभेच्छा न स्वीकारण्याचे ठरवले होते व शक्यतो फोन, संदेश, फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातुन शुभेच्छा द्या कृपया घरातच रहा, सुरक्षित रहा, घरूनच शुभेच्छा द्या असा संदेश दिला होता. दि २७ जुलै रोजी अयोध्या केंद्रे यांनी सकाळी आपल्या घरात वाढदिवसानिमित्त देव देवतांची विधिवत पुजा अर्चना करून ५१ दिप प्रज्वलीत केले तसेच साई गणेश मिल्ट्री फाऊंडेशन रूध्दा पाटी येथे ५००० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केंद्रे परिवाराकडून करण्यात आला व काही वृक्षांची लागवड देखील करण्यात आली असुन पंचक्रोशीतील शेकडो गोरगरीब,मजुर, गरजुंना अन्नदान करण्यात आले यावेळी अयोध्याताई केंद्रे यांचे पती जि.प. सदस्य तथा पं.स माजी सभापती अशोक काका केंद्रे, मुलगी सुषमा (दिदी) यांच्यासह केंद्रे कुटुंबातील अन्य सदस्य अपस्थित होते.


Post a Comment

0 Comments