तडका
शहाणपण
आपलं फाटलं की,
कोणीही बोट घालत असतं।
मऊ, मऊ लागलं तसं,
पुढे,पुढेच सरकावत असतं।
राजकारणात ही जोकर,
कधी गुलाम बनत असतो।
काळेपान एक्का सर्वाना,
सभोवती फिरवत असतो।
दमडी अन् कवडी किम्मत,
कोण कोणाची काढू नये?
आजोबाला शहाणपण,
नातवाने शिकवू नये?
आर.आर.सोमवंशी(निटूरकर)
0 Comments