Latest News

6/recent/ticker-posts

मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकाऱ्याचा मनसेकडून स्पॉट पंचनामा

मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकाऱ्याचा मनसेकडून स्पॉट पंचनामा


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) कोरोना सारख्या माहामारीच्या संकटांचा सामान करीत असताना कांही कर्मचारी मुख्यालयी न राहता घरभाडे उचलुन शासनांची फसवणुक करीत आहेत.याबाबत मनसे ने निवेदन देऊन मुख्यालयी राहावे म्हणून कर्मचाऱ्यांना सर्तक केले होते.आज कांही कार्यालयात मनसे ने पाहाणी करुन पंचनामा केला. चाकूर येथे काही अधिकारी मुख्यालयी राहत नसल्या मुळे मनसेने अनेकदा निवेदने दिले त्यावरती तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी मुख्यालयी राहण्याचा आदेश काढला.काही अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालयी राहणे चालू केले परंतु पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सरवदे हे मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांसाठी लढणारे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी कार्यालयामध्ये धडक दिली व त्यांना जाब विचारत धारेवर धरले.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी तहसीलदार डॉ. शिवानांद बिडवे यांना पाचारण केले.त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी न राहता आपण शासनाची फसवणूक करून घरभाडे कसे काय उचलू शकता याविषयी लेखी देण्यास सांगितले.त्यावरती डॉ. सरवदे हे आपणाला तीन ठिकाणचा चार्ज असल्याचे म्हणाले.त्यावरती डॉ. भिकाणे यांनी त्यांना देवणी या मुख्यालयी राहून चाकूर साठी स्वतंत्र अधिकारी देण्याची मागणी केली. त्यावरती चाकूरला येत्या दहा तारखेला नवीन अधिकारी येईल याची ग्वाही तहसीलदार डॉ. शिवानांद बिडवे यांनी यंत्रणेशी बोलून दिली.हा स्पॉट पंचनामा मुख्यालयी राहणाऱ्या अधिकाऱ्यांना एक सबक असेल व मनसे कृषी व पशु या शेतकरी विषयक बाबींवर गंभीर राहील असे डॉ. भिकाणे यांनी सांगितले.या स्पॉट पंचनाम्यामुळे चाकूरला नवीन पशुवैद्यकीय अधिकारी मिळणार आहे ज्यामुळे शेतकरी पशुविषयक समस्यांपासून सुटणार आहे कारण रुग्णालयात डॉक्टर न भेटण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.या प्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी काळजी घेतली.या स्पॉट पंचनाम्यासाठी मनसेचे कृषितालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,उपाध्यक्ष ज्ञानोबा गुरव,शहराध्यक्ष अजय धनेश्वर, जनार्दन इरलापल्ले, तुलशीदास माने आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments