औसा शहरात अफसर युवा मंचातर्फे मन्सूरा काढा किट चे वाटप
औसा:(तालुका प्रतिनिधी बी.जी.शेख)दि. ६ - शहरात कोरोना सारख्या आजारावर रामबाण उपाय ठरलेल्या मालेगावी मन्सूरा काढा किट चे वाटप शहरात अफसर युवा मंचा तर्फे करण्यात येत आहे.
शहरांमध्ये कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर प्रशासनाने देखील कडक ऊपाय योजना केल्या. मात्र त्यामध्ये काही उणिवा आहेत की काय की ज्यामुळे रुग्णसंख्या कमी होत नाही. म्हणून येथील सुजाण नागरिकांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांच्याकडे विनंती केली होती की आपल्या शहरात मालेगाव प्रमाणेच काढा किट वाटप करण्यात यावा या मागणीचा विचार करून नगराध्यक्षांनी शहरात प्रभागातील नगरसेवका मार्फत काढा किट चे वाटप केले.
आता येणारा काळच ठरवेल की या काढ्यामुळे काय परिणाम घडून येतात.
शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी शहरांमध्ये गर्दीचे प्रमाण कमी होत असताना दिसत नाही ज्या वेळेला दिल्लीमध्ये एक रूग्न आढळुन आला त्यावेळेला सर्व जनता आपल्या घरातून बाहेर येत नव्हती. मात्र आता तो शेजाऱ्याच्या घरात आला असतानाही कोणीही त्याची तमा बाळगत नसल्याचे चित्र औसा शहरात दिसून येते आहे.
0 Comments