भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सिध्दन भेटेकर काँग्रेसच्या वाटेवर
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी.जी.शेख)दि.५ - लातूर.भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सिध्दन भेटेकर हे पक्षातील गटातटाच्या राजकारणाला त्रासून व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कार्यक्षम असे काम होत नसल्याने तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या गटतटामुळे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे कळते. भेटकर यांनी जिल्ह्यात युवा मोर्चाची ओळख करून दिली. औसा तालुक्यात अनेक वेळा भारतीय जनता पार्टीने उमेदवार उभा केला मात्र आमदारकीच्या निवडणुकीत म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही.जेव्हापासून पक्षाची धुरा सांभाळली तेव्हापासून ग्रामीण भागात तसेच तालुक्यातील महत्वपूर्ण गावांमध्ये पक्षाची बांधणी केली व आमदार व जिल्हा परिषदेतील उमेदवारांना अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे श्रेय यांना जाते. मात्र मागील काही दिवसापासून पक्षातील गटातटाच्या राजकारणामुळे व शेतकऱ्यांच्या उसाच्या प्रश्नासाठी योग्य न्याय मिळत नसल्याने त्यांनी पक्ष सोडणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
0 Comments