निटूर ते लातूर मार्गावर प्रवाशांची आर्थिक लूट
निटूर:{तालुका प्रतिनिधी/इरफान शेख} निटूर ते लातूर मार्गावर प्रवाशांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. निटूर ते लातूर मार्गावर एस.टी. महामंडळाच्या गाड्या कमी असल्यामुळे नागरिकांना नाइलाज खाजगी (अवैध वाहतूक) गाड्यांचा वापर करावा लागत आहे अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या निटूर ते लातूर 70 रु. तिकीट घेत आहेत व एस. टी महामंडळाला 45 रु. तिकीट आहे. प्रवाशांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. निटूर ते लातूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी व वर्दळ आहे तरी संबंधित आगार प्रमुखांनी व लोकप्रतिनिधीने विशेष लक्ष घालून निटूर ते लातूर मार्गावर जास्त गाड्या सोडव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
0 Comments