Latest News

6/recent/ticker-posts

पक्ष्यांचे आगमन व निसर्ग

 पक्ष्यांचे आगमन व निसर्ग


निसर्गाने मानवास सुख -सोईंचं वरदान दिलेलं आहे. पण निसर्गाच्या सहवासाला मात्र मानव मुकत चालला आहे.मानवाने स्वतःच्या विकासापोटी पर्यावरणाचा समतोल बिघडवून ठेवला. विकासाच्या नावावर बेसुमार वृक्षांची कत्तल सामान्य गोष्ट झाली आहे. विकासाला विरोध जरी नसला तरी पर्यावरणाशी हेळसांड  ही कितपत योग्य आहे.झाडे तोडल्यावर पर्यायी झाडे लावली जातात मात्र त्याची योग्यरित्या काळजी मोजकेच घेताना दिसून येतात.नागपूर मधेही 'अजनी वन बचाव' या संकल्पनेअंतर्गत कुणाल मौर्य यांच्या नेतृत्वाखाली दर बुधवारी शांततापूर्णरितीने विरोध दर्शविला जातो. एकविसाव्या शतकात विज्ञानाने गरुडझेप घेतली असली तरी तत्पूर्वी निसर्गाकडून मिळणार्‍या संकेतावर भाकित वर्तवले जायचे. कावळ्याचे घरटे कुठे आहे या स्थितीवरून पाऊस जास्त होणार ,कमी होणार कि दुष्काळ पडणार या गोष्टी कळायच्या. पक्षांच्या आगमन आणि गमनावर पावसाचा अंदाज वर्तविला जायचा या हवामाना संदर्भात बातम्या आपणांस आज इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून कळत असल्या तरी त्या नेहमीच खऱ्या ठरतात असे नाही मात्र पक्षी आगमन -गमनावरून पावसा संबंधिचा अंदाज 100%खरे ठरताना दिसतात. पाऊस आगमनाची पहिली खूण म्हणजे 'पावशा' हा पक्षी.हा पक्षी देखील पावसाच्या आगमनाची बातमी बळीराजाला देत असतो. जणू "पेरते व्हा"असा संदेश तो देत असतो.हा भारत पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूतान मध्ये आढळतो.  कडूनिंब, अंबा, पिंपळ, करंज या झाडांवर त्याचे घरटे असते. आणि पाऊस थांबण्याची सूचना धोबी पक्षाच्या आगमनाने शेतकर्‍यांना होते. निसर्गाने मानवांस सुख -सोईंचं वरदान दिलं आहे त्यामुळे त्याचा कळत नकळत आपल्याकडून होणारा ऱ्हास थांबवणंही आपल्याच हातात आहे.

गजाला म.खान{पत्रकार}

Post a Comment

0 Comments