Latest News

6/recent/ticker-posts

गावात शटर डाउन,शिवारात गजबजले टाउन;भादा व परिसरात वेळ आमावस्या उत्साहात साजरी

गावात शटर डाउन,शिवारात गजबजले टाउन;भादा व परिसरात वेळ आमावस्या उत्साहात साजरी


{बाबुराव आगलावे}

सा तालुक्यातील भादा व परिसरात वेळ आमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली.   गावात निवडणुकीची  धामधुम चालु असुन देखील सकाळ पासुनच गाव निर्मनुष्य व्हायला सुरूवात होत होती.  व्यापारी लाईनचेही सकाळी लवकरच शटर डाउन व्हायला लागले तर  शेतशिवारात ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील लोकांनीही या सणाला उत्साहात हजेरी लावली.  त्यामुळे गावात शटर डाउन अन शिवारात गजबजले  टाउन अशीच परिस्थिति सर्वत्र दिसत होती. यात लहान बालकापासुन  वृद्ध माणसांनीही आनंदाने शेतशिवारात हजेरी लावली.  शहरातुन आलेल्या पाहुण्यांनी जांबं , बोरं , डहाळे , व अनेक  रान मेव्यावर   मनसोक्त ताव मारला.

  


    भादा व परिसरातील शिवली , वरवडा , टाका , वडजी , गुळखेडा सह  बोरगाव या गावा सहीत सर्वत्रच हा सण आनंदात साजरा करण्यात आला. 

 काळानुसार यावर्षीही बैलगाड्याचा वापर कमीच दिसला.

Post a Comment

0 Comments