भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमाने साजरी
लातूर: सेलू (बु) ता. लातूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सेलू (बू) येथे विविध उपक्रमानी आज मंगळवार दि 26 एप्रिल 2022 रोजी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भीम जयंती उत्सव समीतीतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, ब्लू पॅंथर संघटनेचे अध्यक्ष साधु गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य सुभाष जाधव सह इतर मान्यवरांचे यावेळी सत्कार करण्यात आले. महामानव प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलीस पाटील उद्धव गायकवाड, शालेय समितीचे उपाध्यक्ष पवन कांबळे, महादेव कांबळे, राजाभाऊ गायकवाड, जगन्नाथ घोडके, भगवान घोडके, विश्वनाथ कांबळे, सिद्धार्थ कांबळे, मिलिंद कांबळे, काशिनाथ कांबळे, भानुदास कांबळे, संभाजी कांबळे, शिवाजी घोडके, हिरो कांबळे, बालाजी कांबळे, उद्धव कांबळे, अरुण घोडके, महिला मंडळ, लहान, थोर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments