Latest News

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची कसून तयारी करावी- सुंदर बोंदर

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची कसून तयारी करावी- सुंदर बोंदर


निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना निलंगा नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर बोंदर यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले कि, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याची संधी सर्वाधिक असते. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास, कठोर परिश्रम घेण्यासाठी मानसिक तयारी आणि योग्य मार्गदर्शन घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये उतरणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सी. जे. कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हंसराज भोसले आणि डॉ. अरुण धालगडे हे उपस्थित होते. आभार डॉ. नरेश पिनमकर यांनी मानले तर सूत्रसंचलन प्रा. संदीप सुर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमात वाणिज्य विभागाचे 100 हुन अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments