भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त शिरोळ येथे भीमगीतांचा कार्यक्रम
शिरोळ:{ सलीमभाई पठाण } येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमीत्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये भीमराव की बेटी... फेम वैशाली शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. अतिशय मंत्रमुग्ध करणारा,समाजप्रबोधनपर गायनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन शिरोळचे सरपंच गौतम सुरवसे हे होते. व्यासपिठावर प्रा.डा.कदम, डी.पी.कांबळे, डी.के सुरवसे, प्रसाद जाधव, कैलास पाटील, मारोती जाधव, दीपक पुंडे, भारतबाई कदम, सुरेश जाधव हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुंडेराव कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद कदम, किशोर कदम, समाधान कदम, अतुल कदम यांनी विशेष प्रयत्न केले.

0 Comments