Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धेत नवी मुंबईचा बोलबाला

राज्यस्तरीय ट्रॅडिशनल रेसलिंग स्पर्धेत नवी मुंबईचा बोलबाला


के.वाय.पटवेकर

नवी मुंबई: रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय ट्रॅडिशनल रेसलिंग व पैनक्रशन चॅम्पियनशिप- 2022 महाबळेश्वर येथे 23 ते 24 मे दरम्यान संपन्न झाली. मास रेसलिंग व पैनक्रशन या दोन खेळ प्रकारात कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबईच्या खेळाडूने 7 सुवर्णपदक, 12 रजतपदक, 6 कास्यपदक पटकाविले यामध्ये अथर्व देशपांडे, महिमा गुप्ता, निकिता धनावडे, सम्पत्ति यादव, निलिमा वाघमारे, साक्षी गोरे, भावेश करे, वैष्णवी खरात, प्राजक्ता रमिष्ठे, साक्षी गाढे, कन्या शिर्क, रजनी गुप्ता, शरयु भागवत या खेळाडूंनी यश संपादन केले. 12 ते 15 मे दरम्यान बलबीर सिंह जुनेजा इंडोर स्टेडियम, रायपूर छत्तीसगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत 7 खेळाडूंची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्राचार्या डॉ. शुभदा नायक, महिला सक्षमीकरण समितीच्या प्रमुख सुजाता बोटे, राष्ट्रीय छात्र सेनेच्या संयोजिका गायत्री गायधने सह आरती धनावडे, शांता गोरे, मंगल वाघमारे, वैजंती यादव, माया गुप्ता, सुरेखा खरात, उषा गाढे, उषा रमिष्टे, आश्लेबा शिर्क, मनोरमा गुप्ता, सारंग भागवत आदी पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक मनोज लिलाधर बरडे, महिला प्रशिक्षिका दिप्ती पवार, रजनी गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



Post a Comment

0 Comments