Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची व्याख्यानाने सांगता

शिरोळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची व्याख्यानाने सांगता


शिरोळ:{प्रतिनिधी/सलीमभाई पठाण} भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरोळ येथे दि.२८.४.२२ रोजी मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर जि. प.शाळेत विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांचं व्याख्यान झाले."बाबासाहेब मानवतावादी होते" माणुस बनण्यासाठी बाबासाहेब समजुन घ्या, नाचण्यापेक्षा वाचण्याकडे तरुण आकर्षीत होणे गरजेचे आहे हे त्यांनी सांगितले तसेच सद्यस्थितीत भोंग्यावरुन जे राजकारण सुरु आहे त्यावर मनातलं राष्ट्रगीत अबाधित राहु द्या असंही परखड मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैजनाथ कदम हे होते. प्रमुख पाहुणे संजय सुरवसे, डी.के.सुरवसे हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुंडेराव कदम यांनी केले आणी समारोप नितीन चंदनशिवे यांच्या "कांबळे" या कवितेने झाला. कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी अरविंद कदम, समाधान कदम, रवी सुरवसे, आकाश कदम, नितीन कदम, किशोर कदम, शुभम कदम, झटींग कदम यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments