"ऐ अल्लाह हमारे मुल्क मे अमन कायम फरमा"ईद च्या नमाजी नंतर मुस्लिम बांधवांनी केले रक्तदान
शेख बी.जी.
भादा: दि. - 3 सलग दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच सर्वत्र एकत्र नमाज पठाण करण्यात आली. या नमाजी मध्ये येथील मौलानांनी या देशात शांती नांदू दे अशा प्रकारची प्रार्थना केली. देशातील वातावरण सद्यस्थितीमध्ये गढूळ असल्याने माझ्या या देशात शांती नांदू दे अशा प्रकारची मागणी ईद च्या नमाजी नंतर भादा येथे करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावातील मुस्लिम बांधव एकत्र येऊन प्रथमच नमाज पठण करत होते.
भादा येथील मौलानांनी प्रथम आपल्या प्रवचनात शांतीचा संदेश दिला. इस्लाम धर्माने कधीही दुसऱ्याला दुःख पोहोचवण्याची शिकवण दिली नाही. म्हणून देशात जी परिस्थिती उद्भवली आहे त्याकडे लक्ष न देता आपण आपल्या ईश्वराची प्रार्थना करावी व आपले नियमित कामे करत राहावे असे अहवान यावेळी केले.
ईदच्या नमाजानंतर गावामध्ये महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी नमाजी नंतर रक्तदान केले. गावातील अनेक हिंदू बांधवांनी यावेळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. अनेकांनी एकमेकाचा घरी जाऊन शीरखुर्माचा आस्वाद घेतला. एकूणच तीन योग एकत्र आल्याने गावात आनंदाचे वातावरण होते.


0 Comments