जिल्ह्यात कोरोनाचा टक्का वाढतोय,शनिवारी तब्बल 22 कोरोना बाधित रुग्ण आढळले
लातूर: जिल्ह्यामध्ये गेली जून महिन्यापासून कोरोना एक दिवसाआड हादरा देत असून मागील 3 दिवसापासून रोजच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे लातूरकरामध्ये पुन्हा कोरोना विषयी भीतीचे वातावरण निर्माण होतानाचे दिसत आहे रोजच कोरोनाची संख्या वाढत असल्याने नागरिक आता दसका घेत आहेत आज शनिवार दिनांक 9 जुलै रोजी लातूर जिल्ह्यात कोरोनाचा टका वाढला असून तब्बल 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
आज शनिवारी लातूर जिल्ह्यात अरटीपीसीआरच्या 122 चाचण्या केल्या यामध्ये एकूण 10 पॉझिटिव रुग्ण आढळले आहेत तर रयपीड अँटीजनच्या 595 चाचण्या केल्या यामध्ये 12 रुग्ण पॉजिठीव आढळून आलेला आहे आज एकूण 717 चाचण्या केल्या असून यामध्ये एकूण 22 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत लातूर जिल्ह्याचा कोरोणाचा पॉजिटिवी रेटही आज वाढला असून 3.1 टक्के वर आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एल एस देशमुख यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या आव्हालात नमूद केले आहे.
0 Comments