सत्यशोधक डॉ संतुजी रामजी लाड यांच्या फलकाचे अनावरण
लातूर: सत्यशोधक समाजाचे अग्रदुत, हिंदु खाटीक समाजभूषण डॉ संतुजी रामजी लाड यांच्या नियोजित पुतळ्यासाठी लातूर महानगर पालिका सर्व साधारण सभा दि २८.०२.२०२२, विषय क्रमांक २१, ठराव क्रमांक २३४ नुसार गांधी मैदान ११२ साईट लगत भालचंद्र ब्लड बँक समोरील जागा मंजूर करण्यात आली आहे.
आखिल भारतीय संतुजी ब्रिगेड, हिंदु खाटीक समाजाच्या वतीने तत्कालीन महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, स्थाई सभापती दिपक मठपती, नगरसेवक राजा मणियार, नगर सेवक व्यंकट वाघमारे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
डॉ संतुजी रामजी लाड यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेच्या फलकाचे अनावरण प्रसंगी ज्येष्ठ समाज सेवक विश्वनाथराव इंगळे, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, शिवसेना जिल्हाउपप्रमुख शंकर रांजनकर, दिपक इंगळे, गोवर्धन गंगणे, अँड प्रदिपसिंह गंगणे, ताहेरभाई सौदागर, अँड सचिन बावगे, गणेश सौदागर, दिपक गंगणे, किरण कांबळे, रोहीत थोरात, दिगबर कांबळे, शिवाजी गंगणे, सुशीकुमार साबणे, राजु बुये, विक्की कांबळे, योगेश गंगणे, इंद्रजित गंगणे, चैतन्य फिस्के आदींची उपस्थिती होती.
0 Comments