रूग्ण हक्क संरक्षण समितीच्या निलंगा कार्याध्यक्षपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची नियुक्ती
निलंगा: तालुक्यातील निटूर येथील रहिवाशी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची रूग्ण हक्क संरक्षण समितीच्या निलंगा कार्याध्यक्षपदी नियुक्तीचे पञ देण्यात आले आहे. सदर नियुक्ती समितीप्रमुख अॅड.निलेश करमुडी, प्रदेशाध्यक्ष हनमंत गोञाळ, लातूर जिल्हाध्यक्ष दिपक गंगणे यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त प्रशांत रघुनाथराव साळुंके ही नियुक्ती रूग्णांचा न्याय व हक्काचे कायम संरक्षण करणारी रूग्ण हक्क संरक्षण समिती या रूग्णहितार्थ रूग्णसेवार्थ समितीच्या निलंगा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे समितीप्रमुख अॅड.निलेश करमुडी यांनी सांगितले आहे या निवडीबद्दल त्यांनी साळुंके यांना पुढील कार्यास अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रशांत रघुनाथराव साळुंके यांनी आपण येणार्या कालावधीत रूग्ण हक्क संरक्षण समितीच्या सर्व नियमाचे पालन करून कोअर कमिटी व वरिष्ठ पदाधिकार्यांच्या सुचनेने व सल्ल्याने आपण समितीचे कार्य वाढवून समितीचे संघटन मजबूत करून न्याय देण्याचा अटोकाट प्रयत्नशील राहीन असे सांगितले.
या अभिनंदनात पंकज कुलकर्णी, विजयकुमार देशमुख, राजकुमार सोनी, संगमेश्वर करंजे, बाळकृष्ण डांगे, सुनिल साळुंके, बालाजी साळुंके, एस.आर.काळे, अंकुश कवडे, राजकुमार मुचूटे, सचिन राठोड, शिवराज स्वामी, धोंडीराम बुरकूले, अशोक शिंदे, कालिदास पाटील, वामन जाधव, विजयकुमार डांगे आदींनी केले आहेत.
0 Comments