जिल्ह्यात कोरोना पसरतोय पाय,शुक्रवारी आढळले 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
लातूर: जिल्ह्यामध्ये जून महिना सुरू झाल्यापासून कोरोनाने आपले पाय हळूहळू पसरायला सुरू केले आहेत जून महिन्यात रोजच दहा ते पंधरा च्या दरम्यान कोरोनाचे रुग्ण सापडत होते मात्र आता जुलै महिना सुरू झाला असतानासुद्धा कोरोना ज्यास्तच वाढत असून काल 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते मात्र आज शुक्रवारी लातूरकरांना थोडासा दिलासा मिळाला असून 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळून आलेले आहेत.
आज लातूर जिल्ह्यात अरटीपीसीआरच्या 243 चाचण्या केल्या यामध्ये एकूण 14 पॉझिटिव रुग्ण आढळले आहेत तर रयपीड अँटीजनच्या 392 चाचण्या केल्या यामध्ये 12 रुग्ण पॉजिठीव आढळून आलेला आहे आज एकूण 635 चाचण्या केल्या असून यामध्ये एकूण 26 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत लातूर जिल्ह्याचा कोरोणाचा पॉजिटिवी रेटही आज वाढला असून 4.1 टक्के वर आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एल एस देशमुख यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या आव्हालात नमूद केले आहे.
0 Comments