Latest News

6/recent/ticker-posts

अजीतकुमार कुरुप यांना यंदाचा स्नेहसंवर्धन पुरस्कार

अजीतकुमार कुरुप यांना यंदाचा स्नेहसंवर्धन पुरस्कार

अंबाजोगाई: आंतरभारती, अंबाजोगाईच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार यंदा मूळ केरळचे राहणारे उषा टायर वर्क्सचे अजीतकुमार शिवकुमार कुरुप यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार १५ ऑगस्ट २०२२ रोजी सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव अमर हबीब व मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष दगडू लोमटे हे या समारंभाचे प्रमुख अतिथी असणार आहेत. अजीतकुमार कुरुप यांना आंतरभारती तर्फे दिला जाणारा यंदाचा स्नेहसंवर्धन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.

९ वा पुरस्कार आंतरभारती अंबाजोगाईने २०१४ साली प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी यांना पुरस्कार देऊन स्नेहसंवर्धन पुरस्काराची सुरुवात केली. त्या नंतर शशिकांत रुपडा (मनीष स्वीट), शंकर मेहता (मेवाड हॉटेल), प्राचार्य एम. बी. शेट्टी (तंत्र महाविद्यालय), आनंद अंकम (श्रीनिवास हेअर सलून), सुशीला शेट्टी (उडपी हॉटेल), शेख शमीम (सिमेंट वस्तूंचे निर्माते), राजू जांगीड (सुतार काम) यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

आंतरभारती अंबाजोगाईचे अध्यक्ष दत्ता वालेकर, सचिव वैजनाथ शेंगुळे, कोषाध्यक्ष राजाभाऊ पिंपळगावकर, कार्यक्रमाचे संयोजक अनिकेत डिघोळकर, संतोष मोहिते, ज्योती शिंदे, शरद लंगे  व अन्य सहकारी कार्यक्रमाची तयारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments