Latest News

6/recent/ticker-posts

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा १३ जुलै रोजी विशेष सन्मान

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा १३ जुलै रोजी विशेष सन्मान

लातूर: दरवर्षी देण्यात येणार्‍या डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवलेल्या मान्यवरांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत दि.१३ जुलै २०२२, बुधवार रोजी सायंकाळी ६:०० वाजता, कुसूम सभागृह, नांदेड येथे संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक रूपेश पाडमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

मीमांसा फाऊंडेशन, व्हाईस ऑफ मिडीया, समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, पत्रकार प्रेस परिषद व ह्यूमन राईट्स फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी माजी गृहमंत्री, पाणीदार नेतृत्व, मराठवाड्याचे भगीरथ श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यातीलच नव्हे तर देशातील नामवंत व्यक्तीमत्वांचा डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत केल्या जातो. यंदाचे हे चौदावे वर्ष आहे. याच सोहळ्यात आपल्या कार्यकर्तृत्वातून नावलौकीक मिळवलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात येतो.

यावर्षी नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करून स्वतःच्या व्यवसायाचे  देशभरात जाळे पसरून प्रत्यक्षात भारत भ्रमण करत नवीन दिशा देणारे भगवान सावंत, कंधार तालुक्यातील नेहरूनगर नागलगांवसह अनेक गावात जलसंधारणाचे महत्व सांगून माळराणावर नंदनवन फुलवणारे संजय पवार, वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून गणीत विषयातून शेकडो विद्यार्थ्यांना इंजीनियरींगचा मार्ग दाखवणारे कोचींग क्लासचे संचालक आर.बी.जाधव, वृत्तपत्र क्षेत्रात अनेक वर्षापासून सेवा देत सामाजीक बांधीलकी जोपासणारे लातूर एबीपी माझाचे निशांत भद्रेश्वर, वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांना प्रकाशीत करणारे औरंगाबादचे प्रकाशक डॉ.बालाजी जाधव, कोरोना काळात राज्यातील शाळा बंद असताना मुलांशी गप्पा उपकृत ऑनलाईन  राबवलेल्या उपक्रमाची पंतप्रधानानी मन की बातमध्ये दखल घेतलेले अर्धापूरचे संतोष राऊत, मागील २५ वर्षापेक्षा अधिक काळापासून विद्यापीठात सेवा देत असताना गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणीला धाऊन जाणारे तथा कोरोना काळातही वंचीताना मदत करणारे सुनिल रावळे, अचूक आणि निरंतर सेवा देत लातूरच्या छत्रपती शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम नॅशनल मॉडल स्कूलमध्ये समन्वयीका म्हणून कार्यरत सौ.स्मिता शिंदे-साळुंके, कोवीड काळात जनतेमध्ये भितीचे वातावरण असताना त्यांच्यात आत्मबळ निर्माण करून अविरत सेवा देणार्‍या डॉ.सुनिता पाटील, कायद्याचे ज्ञान सर्वांनाच झाले पाहिजे पण विनाकारण अन्याय होऊ नये म्हणून सातत्याने वकीली व्यवसायातून समाजसेवा करणार्‍या अ‍ॅड.अनघा अण्णाराव पाटील, समाजातील प्रत्येक घटकाच्या मुलींना आपल्या पायावर उभे राहता यावे म्हणून त्यांना ब्युटी पार्लर उभारण्याचे धडे देत असलेल्या सौंदर्य तज्ञ मंजूषा घोरपडे, व्यसनमुक्तीतून नवा समाज घडवण्याचा ध्यास घेतलेल्या आणि त्यासाठी अहोरात्र परिश्रम करणार्‍या प्रा.अंजली पाटील, केवळ सरकारी नौकरी म्हणजे पोट भरण्याचे साधन नसून गरजवंताना त्याचा उपयोग झाला पाहिजे या उद्दात हेतूने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मुख्य लिपीक म्हणून सेवा देणार्‍या ज्योती गायकवाड, गावचा विकास करणे हे ध्येय ठेऊन सातत्याने जनसेवेत राहणारे पाखरसांगवीचे उपसरपंच भिमाशंकर लखादिवे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

तरी सदरील पुरस्कार सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ह्यूमन राइट्स चे प्रशासकीय संचालक रामेश्वर जी धुमाळ मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे सचिन सूर्यवंशी, तथा संपादक रूपेश पाडमुख,दयानंद एरंडे, सुनील फुलारी, दगडू हंडरगुळे, रवी बीजलवाड ,प्रीती भगत, सुवर्णा हाके, सुरेश ढवळे, विनय जाकते, चंद्रकांत धुमाळ, संतोष साखरे, करण शिंदे पाटील ,अनिल सोमवंशी, प्रथमेश गोताळकर, शंकर बचाटे, महेश क्षीरसागर, परमेश्वर बनसोडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments