औसा तालुक्यात दमदार नाही पण संततधार पावसाची हजेरी;पेरलेली पिके तरारली पण मोठ्या पावसाची आवश्यकता
बी डी उबाळे
औसा: सध्या औसा तालुक्यामध्ये शुक्रवार दि 8 जुलै 2022 रोजी सकाळी 8:00 वाजले पासून पावसाला सुरुवात झाली होती तो पाऊस 27 मी मी पडला असल्याची नोंद राम दुधाभाते तलाठी भादा यांच्याकडून उपलब्ध झाली आहे आणि शनिवार दि 9 जुलै 2022 रोजी या दोन दिवस संततधार पावसाची हजेरी तालुक्यात लागली असून त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी शेतातील वापसा झाल्यावर कधी पेरणी करू? असा खत बी-बियाणे खरेदी करून पेरणी योग्य पावसाची वाट पाहत सज्ज झाला आहे.
औसा तालुक्याचे खरीप हंगाम अंदाजे एकूण क्षेत्र 1 लाख 10 हजार हेक्टर असून यापैकी जवळपास 11 हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आल्याचा अहवाल कृषी विभागाकडून उपलब्ध झाला असून बाकीचे क्षेत्र हे पावसाविना पेरणी थांबली आहे परंतु गेल्या दोन दिवसापासून संततदार पाऊस पडत आहे. हा पाऊस संततदार आहे परंतु दमदार नाही यामुळे शेतकरी आता पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पेरणीसाठी सज्ज झाल्याचे चित्र औसा तालुक्यामध्ये दिसून येत आहे. तर औसा तालुक्यामध्ये आणखी मोठ्या पावसाची अत्यंत आवश्यकता असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
0 Comments