Latest News

6/recent/ticker-posts

मनसेच्या राज्य उपाध्यक्षपदी रेखा नागराळे यांची निवड

मनसेच्या राज्य उपाध्यक्षपदी रेखा नागराळे यांची निवड

बी डी उबाळे
औसा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दि.९ जुलै २०२२ रोजी राजगड कार्यालय मुंबई येथे पक्षाच्या नेत्या रिटा गुप्ता व नेत्या शालिनी ठाकरे यांनी रेखा नागराळे रा शिवली ता औसा यांची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र दिले.

या सन्मानाबद्दल व नियुक्ती बद्दल राज ठाकरे, शर्मिला, अमित ठाकरे, रिटा गुप्ता, शालिनी ठाकरे यांनी जो विश्वास दाखवून पक्षाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्त केले त्याबद्दल त्यांचे शतशः ऋणी आहोत तसेच वरीलपैकी नेत्यासह पक्षाचे नेते अनिल शिदोरे, आमदार राजू पाटील. नेते अभिजीत पानसे, दिलीप धोत्रे, जावेद शेख, संतोष नागरगोजे यांच्यासह सर्वच ज्येष्ठ नेते व जिल्ह्यातील तालुक्यातील औसा मतदारसंघासह कर्मभूमी व जन्मभूमी शिवली येथील आजी-माजी पदाधिकारी, सर्वसहकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ यांचे देखील खूप खूप ऋणी व त्यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments