ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त भादा येथे महा रक्तदान शिबिर
बि डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथे ग्रामदैवत खंडोबा यात्रेनिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन आधार प्रतिष्ठान भादा कडून करण्यात आले आहे.
आधार प्रतिष्ठान भादा हे गेल्या दोन वर्षापासून सामाजिक शैक्षणिक,आरोग्य,शेती आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यापक काम करीत असून बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथील रक्त संकलन टीम उपस्थित राहणार आहे तरी औसा तालुक्यातील नागरिकांनी या महाक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आधार प्रतिष्ठानचे आर आर पाटील, मनोज पाटील, बी डी उबाळे, रियाजोड्डीन खोजे, मनोज उबाळे, सुनील राऊत, लखन लटूरे, प्रशांत पाटील, दिपक मानधने, पांडुरंग बनसोडे, शमशोदीन खोजे यांनी केले आहे.


0 Comments