बेलकुंड ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला
प्रतिनिधी/महेश कोळी
बेलकुंड: येथील ग्रामपंचायत कार्यालयात ७३ वा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर सोनवते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन जिल्हा परिषद प्रशाला बेलकुंड येथील पहिलीचा विद्यार्थी प्रणव महेश कोळी यांच्यातर्फे करण्यात आले. सम्राट युवा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी यावेळी भारतीय संविधानाचे काय महत्व आहे हे पटवून सांगितले. संविधान तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली होती यामध्ये विविध समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यामधील महत्त्वाची समिती मसुदा समिती होती त्या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते.
यावेळी बेलकुंड ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू कोळी, तंटामुक्ती अध्यक्ष शकील शेख, ग्रामपंचायत सदस्य समाधान कांबळे, राजेंद्र कांबळे, रवींद्र माळवदे, वंचित बहुजन आघाडी युवा तालुका अध्यक्ष अखिल शेख, देविदास कांबळे, विठ्ठल साळुंखे, राजेंद्र शिंदे, लखन रसाळ, गणेश यादव, उमेश कांबळे, वाघ कांबळे, मंगेश कनकधर आदी उपस्थित होते.


0 Comments