तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेत अल फारुख उर्दू माध्यमिक विद्यालय नळेगावच्या मुलींचा संघ तालुक्यात प्रथम
नळेगाव: दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी नळेगाव येथे अल फारुख उर्दू विद्यालयात झालेल्या तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेत अल फारुख उर्दू माध्यमिक विद्यालय नळेगावच्या मुलींच्या संघाने 17 वर्ष व 14 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष मुजीब पटेल जागीरदार, अध्यक्ष नजीब जागीरदार, सचिव शुकूर जागीरदार, मुख्याध्यापक वहाब जागीरदार, कादीर जागीरदार, क्रीडा शिक्षक हुसैन घोरवाडे सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.



0 Comments