Latest News

6/recent/ticker-posts

आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

आबासाहेब इंग्लिश स्कूल देवणी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार 

देवणी: तालुक्यातील आबासाहेब इंग्लिश स्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन करण्यात आले व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश घेऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी  निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

आबासाहेब इंग्लिश स्कूलचे एकूण 25 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणीचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण डोईजोडे, विष्णू मोरे, आबासाहेब भद्रे, आनंद जीवने,  रामराव बिरादार माजी सरपंच भोपणी, माधव दमकोंडवार, नर्सिंग दोडके, रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे व उपप्राचार्य डॉ.शिवाजी सोनटक्के, आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सुप्रिया कांबळे, आबासाहेब निवासी शाळेचे गृहप्रमुख बिरादार विश्वनाथ, वैष्णवी बिरादार, क्रीडा शिक्षक विक्रम गायकवाड, प्रशांत घोलपे, रंजीत गायकवाड, आंबेनगर उमेश, प्रियंका मंटोले, श्रद्धा डोंगरे आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments