Latest News

6/recent/ticker-posts

लातूर शहर पोलीसच देणार रिक्षाचालकांना गणवेश; राज्यातला पहिलाच उपक्रम

लातूर शहर पोलीसच देणार रिक्षाचालकांना गणवेश; राज्यातला पहिलाच उपक्रम

लातूर: रिक्षा चालकांना गणवेशाची सक्ती करण्याचा विचार असतानाच लातूर शहर वाहतूक पोलिसांनी मात्र, रिक्षाचालकांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्या रिक्षाचालकांकडे लायसन्स आणि परमिट आहे. अशा परवानाधारक रिक्षाचालकांना पहिल्या टप्प्यात १ हजार गणवेशाचे वाटप केले जाणार आहे.

शहर वाहतूक पोलीस शाखेने खटले दाखल करुन वाहनधारकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता सामाजिक बांधिलकीचेही उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणुन रिक्षा चालकांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक संस्थांच्या सहकाऱ्याने शहरातील १ हजार रिक्षा चालकांना मोफत गणवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील हा पहिला उपक्रम असेल. १५ एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता शहर वाहतूक शाखा गांधी चौक येथे ड्रेसचे वितरण होणार आहे.

Post a Comment

0 Comments