विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भादा येथे उत्साहात
बी डी उबाळे
औसा: भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भादा येथे त्याच्या उतुंग बुद्धीमत्तेवर आणि सामाजिक कार्यावर, देश प्रेमावर, दूरदृष्टीने केलेल्या अनमोल जीवन कार्यावर फिदा असणाऱ्या आंबेडकर प्रेमी बांधवांनी घटनेच्या शिल्पकारांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोभावे अभिवादन केले.
भादा येथेल जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र,अंगणवाडी सह भीम नगर मध्ये जयंती साजरी करून ग्रामपंचायत भादा येथे सर्व आंबेडकर प्रेमींनी जयंती साजरी केली. यावेळी भादा ग्रामपंचायत उपसरपंच बालाजी शिंदे, हणमंत दरेकर, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे, अमोल पाटील, योगेश लटूरे, तय्यब पठाण आदी सदस्य उपस्थित होते.


0 Comments