ग्रामपंचायत कार्यालय भादा येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा
बी डी उबाळे
औसा: भादा तालुका औसा येथे ग्रामपंचायत भादाकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी भादा सरपंच मिनाबाई दरेकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत येथे महामानव आणि कामगारांचे, स्त्रियांचे उध्दारकरते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करून हा महाराष्ट्र दिन कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच बालाजी शिंदे ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी,शाळेतील शिक्षक टीम, ग्रामपंचायत सदस्य योगेश लटूरे,तानाजी गायकवाड,तय्यब पठाण भादेकर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments