Latest News

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प. आनंदनगर भादा शाळेचे 11 विद्यार्थी पात्र:शाळेकडून सत्कार

शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प. आनंदनगर भादा शाळेचे 11 विद्यार्थी पात्र:शाळेकडून सत्कार


बी डी उबाळे 

औसा: जि.प.प्रा.शा.आनंदनगर,भादा येथे महाराष्ट्रदिन व कामगार दिन  मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बेस्ट रीडर अवॉर्ड चे वितरण आणी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती पात्र विद्याथीॅ व शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा (इ.5वी) 2023 अंतर्गत घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये जि.प.प्रा. शा. आनंदनगर, भादा येथील 11 वि पात्र झाले आहेत. त्यामध्ये गिरी पल्लवी दिनेश,आपेक्षा जलिंदर लुंगसे बनसोडे विरान गणेश,शिवानंद सोपान हरहरकर,गायकवाड जान्हवी रेवण,बनसोडे गणेश जयराम, बनसोडे अक्षय कृष्णा,चिंचोलकर भन्नी डिंगवर, स्वामी गौरवी संतोष, गिरी गौरवी अनिल,डोलारे रितेश रामू सर्व गुणवंत विद्यापीचे शाळेच्या व ग्रामण्याच्या वतीने अभिनंदन करण्यान आले.


यावेळी मला उपसरपंच बालाजी शिंदे,तलाठी राम दुधभाते,ग्रामपंचायत सदस्य योगेश लटुरे,तानाजी गायकवाड,तय्यब पठाण, शाळा समिती अध्यक्ष दिपक मांनधने,पांडुरंग बनसोडे,वसंत देडे,सतिष कात्रे आणि शाळेतील शिक्षक श्रीमती चव्हाण आय एच (मुख्याध्यापक) श्रीमती राठोड आशा,श्रीमती ठाकूर सुचिता, श्रीमती बादाडे नम्रता,श्रीमती जगताप अनुराधा,बाडगीरे शिवाजी,जाधव श्रीहरी,महेश कांबळे,अंगणवाडी सेविका कुसुम उबाळे, शिला कोळी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments