औसा तालुक्यात रोहयो उपजिल्हाधिकारी यांची नरेगा कामांना भेट; कामाच्या प्रतवारी बाबत समाधान
बी डी उबाळे
औसा: औसा तालुक्याची मोठ्या प्रमाणात नरेगा कामांची चर्चा जिल्ह्यामध्ये आहे. यामुळे या तालुक्यांमध्ये केलेली कामे कोणत्या पद्धतीची आहेत आणि ती कशा पद्धतीने मेंटेन केली जातात याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती सुत्रावे लातूर यांनी MREGS अंतर्गत सुरू असलेल्या भादा - वडजी शिवलीं शिव रस्ता या मातोश्री अंतर्गत पूर्णत्वास आलेल्या रस्त्यास बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी दुपारी 3:00 वाजता भेट देऊन पाहणी केली आणि रस्त्याची प्रतवारी पाहून समाधान व्यक्त केले.
यानंतर आनंद नगर जिल्हा परिषद प्रशाला भादा या ठिकाणी बिहार पॅटर्न वृक्ष लागवड. यामध्ये नारळ वृक्षाची पाहणी केली आणि त्या ठिकाणी रेन हार्वेस्टिंग चे कामही सुरू आहे त्याचीही पाहणी करून त्याही कामाबाबत समाधान व्यक्त केले. आणि गावामध्ये राबविण्यात आलेल्या शासकीय योजना आणि त्यापासून मिळणारे आउटपुट याचे व्यवस्थितपणे नियोजन चालू असून या शासकीय योजना अशाच प्रभावीपणे राबविण्यात याव्या योजना राबविलेल्या कामाचे माहिती सह फलक प्रत्येक कामावर लावण्याच्या सूचना केल्या
जेणेकरून ग्रामीण भागाचा विकास होईल याबाबतही त्यांनी भादा उपसरपंच बालाजी शिंदे, ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सूर्यकांत बारबोले, पावले, तांत्रिक अधिकारी नितीन चव्हाण, ग्राम रोजगार सेवक बालाजी उबाळे यांच्याशी चर्चा केली आणि सुरू असलेल्या नरेगा अंतर्गत रस्ते, रेन हार्वेस्टिंग, बिहार पॅटर्न वृक्ष लागवड आणि वैयक्तिक कामे याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच सदरील सार्वजनिक आणि वैयक्तिक कामाबाबत शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या पत्रकानुसार कामाचे संपूर्ण वर्गीकरण असलेले दिशादर्शक फलक लावण्याच्या मुख्यत्वे करून त्यांनी भादा ग्रामपंचायतला सूचना करण्यात आल्या. यानंतर लखनगाव,आलमला आदी भागांचाही दौरा यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी केला असल्याचे समजते.
0 Comments