Latest News

6/recent/ticker-posts

तब्बल 24 वर्षाने मिळाला जुण्या आठवणींना उजाळा, निटूरात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात, गुरूजनांचा ही सन्मान

तब्बल 24 वर्षाने मिळाला जुण्या आठवणींना उजाळा, निटूरात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात, गुरूजनांचा ही सन्मान


लातूर: तब्बल तीन दशकानंतर मा. विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा निटूर ता. निलंगा येथेल अदिती मंगल कार्यालय मध्ये पार पडला या मेळाव्याला इ. स. 1999 साली दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी सह तत्कालीन शिक्षकांनी हजेरी लावली यामध्ये उपस्थित असलेल्या सर्व गुरू जनांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

निटूर येथेल अदिती मंगल कार्यालय शुक्रवारी माजी विद्यार्थांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व विद्यार्थ्यांसह गुरूजनांना निमंञीत करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनी ने आपापले परीचय करून देवून मनोगत ही व्यक्त केले अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना आपण कसे घडलो यावर भावनिक संवाद साधत गुरूजींच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही चांगल्या पदावर असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवात दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी नी मनोगत व्यक्त केले. तब्बल 24 वर्षानंतर एकत्र आल्याने अनेकांनी ऐकमेकांची अस्थेवाईकपणे चौकशी करून संवाद साधला या कार्यक्रमामध्ये तत्कालीन शिक्षक एन बी रामेगावकर, एस बी सय्यद, एम जी चपटे, जी डी कानडे, एस बी सोनटक्के, जी एम वाराद, ए पी जाधव, बीएस सोनटक्के मंचावर उपस्थित होते. मंचावर उपस्थित असलेल्या शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून उर्वरीत आयुष्यासाठी स्नेह मेळाव्यास जमलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. दोन सत्रात चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता अपघात ग्रस्त असलेल्या मैत्रिणीला समूहातर्फे आर्थिक मदत करण्यात आली यावेळी दैवशाला बुरकुले, पल्लवी कुलकर्णी, रेणू नाईक, संगीता लंगडे, दिपाली नाईक, शैलजा पागवाले, मीनाक्षी सोळुंके, अर्चना बुडगे, वैशाली कावेरी, वनिता कोळी, ज्योती जोशी, लता टोपे, सुवर्णा सोनटक्के, ज्योती चव्हाण, मनीषा हासबे, शुभांगी डांगे, यास्मिन उजेडे, अलका भोसले, रेखा कांबळे, सुवर्णा सूर्यवंशी, निर्मला चव्हाण सह

के वाय पटवेकर, रंगनाथ करंजे, अनिल गायकवाड, नंदकिशोर मधाळे, गुरुनाथ सुतार, धीरज भालके, अभय सोमवंशी, नंदकुमार पवार, पवन गिरी, महेश कनशेटे, जहांगीर फकीर, उत्तम जगदाळे, सतीश भदर्गे, बालाजी चौधरी, गोपाळ संगपाळ, दयानंद शिवणे, महेश शिवणे, बालाजी विभुते, शमशोदिन शेख ,संतोष शिंदे, रुपेश नागलगावे, महेश पाटील, अण्णाराव बुडगे, अविनाश स्वामी, ईश्वर हासबे, राजकुमार शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित पत्रकार के. वाय. पटवेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन दैवशाला बुरकुले, रेणू नाईक, रुपेश नागलगावे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गुरुनाथ सुतार यांनी केले.

Post a Comment

0 Comments