औसा तालुक्यात सामूहिक महा बुद्ध वंदना घेऊन तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी
बी डी उबाळे
औसा: विश्वाला शांततेचा संदेश देणारे सत्य,अहिंसा आणि करुणेचा मार्ग दाखवणारे, विश्व वंदनिय महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांना बुद्ध पौर्णिमेनिमित्त कोटी-कोटी वंदन आणि बुद्धपौर्णिमा निमित्त औसा तालुक्यात मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.
तालुक्यातील भादा येथे आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023रोजी 2567 वी जयंती आणि बौद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक ध्वजारोहण करून सामूहिक रित्या महा बुद्ध वंदना धम्मवंदना संघ वंदना घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भादा तालुका औसा येथील बौद्ध नगर येथे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर महात्मा गौतम बुद्ध आणि घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन करून सामूहिक महा बौद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी उपसरपंच बालाजी शिंदे,भादा पोलीस ठाण्याचे बीट अमलदार बंडू डोलारे आणि जयंती समितीचे सर्व कार्यकर्ते आणि समाजातील सर्व समाज बांधव लहान थोर महिला पुरुष मोठ्या संख्येने या महा बुद्ध वंदना घेण्यासाठी उपस्थित होते. तर तालुक्यातील बुधोडा, हासेगाव, खरोसा, किल्लारी, नागरसोगा,अलमला, बेलकुंड, मातोळा, जवळगा, लिंबाळा, मंगरूळ आदी अनेक गावातून बुद्ध अनुयायी यांनी भगवान बुद्धाना मनोभावे अभिवादन केले.
0 Comments