शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या प्रस्तावित पुरस्कार्थी यादीवर आक्षेप सादर करण्याचे आवाहन
लातूर:(जिमाका) दि. 17 - राज्य शासनाच्या क्रीडा विभागामर्फत प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार’ , ‘उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार’, ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)’, ‘शिवछत्रपती राज्यसाहसी क्रीडा पुरस्कार’, ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)’ असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाच्या दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार नियम क्र. 4 अन्वये संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार या टॅबमध्ये (इंग्रजीकरीता -Awards) राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीने शिफारस केलेल्या प्रस्तावित पुरस्कार्थीची यादी दि. 16 ते 22 मे, 2023 या कालावधीत प्रसिध्द करण्यात येत आहे. त्यानुसार याबाबत आक्षेप असल्यास संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in या ई-मेलवर 16 ते 22 मे, 2023 या कालावधीत विहित नमुन्यात आक्षेप तथा हरकती सादर कराव्यात. विहीत नमूना https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास उपलब्ध आहे. विहीत कालावधीत प्राप्त होणाऱ्या हरकत, आक्षेप यांचा विचार करण्यात येईल, असे क्रीडा विभागाने कळविले आहे.
0 Comments