Latest News

6/recent/ticker-posts

नूतन खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांचा निटूर जिल्हा परिषद गट यांच्या वतीने सत्कार

नूतन खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांचा निटूर जिल्हा परिषद गट यांच्या वतीने सत्कार


लातूर : नूतन खासदार डॉ.शिवाजीराव काळगे यांनी त्यांच्या आभार व संपर्क दौऱ्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा तालुक्यातील निटूर(मोड) येथे सर्व मतदार बंधू-भगिनीं, गावातील कार्यकर्ते, बुथ एजंट, बुथ प्रमुख, सर्कल प्रमुख, गटप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी, नेते, विविध क्षेत्रातील तथा विविध पक्षातीत हितचिंतक यांनी नूतन खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांचा निटूर जिल्हा परिषद गट यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. व निलंगा तालुका लोकसभेसाठी मताधिक्य दिल्याबद्दल निटूर जिल्हा परिषद सर्कल च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस माननीय अशोकराव पाटील निलंगेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अभय साळुंखे, अजित माने, डॉ. अरविंद भाताब्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुरेंद्र धुमाळ, निटूर सोसायटी चेअरमन दिनकर(नाना) निटूरे, अशोक हासबे, विठ्ठल काटेवाड, जब्बार चाऊस, नतीब चाऊस, प्रसाद बुडगे, इसाक गस्ते, नानाराव सोमवंशी, शेंदचे सरपंच रमेश मोगरगे, अशोक भदरगे, पंडित भदरगे, मुगावचे चांदसाब शेख, इस्माईल शेख, महंमद शेख, दीपक कसे, बाळू कळशे, नवाब शेख, लिंबराज जाधव, अमोल सूर्यवंशी, नरसिंग पाटील, ज्ञानोबा पाटील, सुरज टमके, प्रभू चव्हाण, रमेश देशमुख, सुनील पाटिल, ज्ञानेश्वर पिंड, गौरचे नरसिंग ढाकणे सह निटूर परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments