Latest News

6/recent/ticker-posts

कोरोना केअर सेंटरसाठी शंभर स्वच्छता किट; अशोकराव वाकळे पाटील यांचा पुढाकार

कोरोना केअर सेंटरसाठी शंभर स्वच्छता किट; अशोकराव वाकळे पाटील यांचा पुढाकार



चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) येथील कोरोना केअर सेंटर मधील रुग्णांची अडचण लक्षात घेऊन बेलगाव (ता.चाकूर) येथील उपसरपंच तथा पत्रकार अशोकराव वाकळे पाटील यांच्या वतीने शंभर स्वच्छता किट देण्यात आल्या. येथील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. येथील सेंटर मध्ये दिवसेनदिवस कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे, ग्रामीण भागातून अनेक रग्ण येतात त्यांच्याजवळ सकाळच्या स्वच्छतेसाठी साहित्य नसते यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊन रुग्णांना ब्रश, टुथपेस्ट, अ.साबन, कपड्याचे साबन, तेल, कंगवा, फास्टकार्ड हे साहित्य 'स्वच्छता किट' च्या माध्यमातून समाजातील दानशुर व्यक्तींनी द्यावे असे आवाहन पत्रकार प्रशांत शेटे यांनी केले होते यास प्रतिसाद देत पत्रकार अशोकराव वाकळे यांनी दहा हजार रूपये किमंतीच्या शंभर स्वच्छता किट दिल्या. तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, पोलिस निरीक्षक जयवंतराव चव्हाण, वैदयकीय अधिक्षक डाॅ. दिपक लांडे, तालूका आरोग्य अधिकारी डाॅ.अर्चना पंडगे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिक्यं रणदीवे यांच्याकडे हे स्वच्छता किट देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोकराव वाकळे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस संगमेश्वर जनगावे, जेष्ठ पत्रकार सुधाकर हेमनर, माधव वाघ, पत्रकार संघाचे सचिव सतिश गाडेकर, पत्रकार सुशिल वाघमारे, गणेश स्वामी, प्रशांत शेटे आदी उपस्थित होते. शंभर स्वच्छता किट दिल्याबद्दल तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे यांनी आभार मानले व समाजातील दानशुर व्यक्तींनी पुढे येथून सहकार्य करावे असे आवाहन केले.


Post a Comment

0 Comments