अनेक ग्रामपंचायतीवर भगवा फडकला पाहिजे - शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा विधानसभेत मजबूत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करावी. आपसातील मतभेद मिटवून टाकावेत, असे अवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यानी निलंगा विधानसभेच्या ग्रामपंचायत निवडणूक आढाव बैठकीत सुयोग मंगल कार्यालय निलंगा येथे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध प्रश्नांवर आंदोलन उभारले पाहिजे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मजबूत संघटनात्मक बांधणी करा असे आदेशही त्यांनी दिले. निलंगा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा. जुन्या पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना सन्मान द्या, लोकांचे प्रश्न सोडवा, गावागावात शिवसेनेच्या शाखा स्थापन करा, शिवसेनेची सदस्यता नोंदणी करा. ज्या गावात शिवसेनेचा सरपंच होईल त्या गावात निधी उपलब्ध करून देण्याचे मी वचन देतो असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. या वेळी अविनाश रेशमे तालुकाप्रमुख निलंगा, संतोष सोमवंशी जिल्हाप्रमुख लातूर, डॉ.शोभताई बेंजरगे महिला जिल्हा संघटक लातूर, विनोद आर्य उपजिल्हाप्रमुख ,शिवाजी माने आदिं मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपिठावर विश्वनाथ स्वामी शहरप्रमुख संभाजीनगर, गादगेअप्पा, बलाजी रेड्डी,कुलदीप सुर्यवंशी,पंडीत भंडारी, भागवत वंगे,शिवचरण पाटील ई मान्यवर उपस्थित होते या आढावा बैठकीचे सुत्रसंचालन संजय बडूरे यानी केले तर आभार प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यानी मानले.
0 Comments